Hindustan Hunt
समाधान आवताडे: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे विकासवादी आणि प्रेरणादायी नेतृत्व

समाधान आवताडे: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे विकासवादी आणि प्रेरणादायी नेतृत्व

पंढरपूर… अर्थात आपली पंढरी… श्री विठ्ठलाची भूमी, देवभूमी… महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह देशभरातील असंख्य वारकऱ्यांचे, भाविक भक्तांचे लाडक्या विठूरायाची नगरी म्हणजे आपलं पंढरपूर. वर्षातील चार प्रमुख एकादशीच्या वारीसाठी ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नामघोष करत लाखो पावलं पंढरीच्या दिशेनं चालायला लागतात. अन लाडक्या विठुरायाला भेटायला आलेल्या वारकऱ्यांमुळे पंढरपूरला माहेराच स्वरूप प्राप्त होत. आपलं सुख दुःख बाजूला सारत वारकरी वारीची वाट चालतात अन सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने कृतार्थ होतात. मात्र विरोधाभास तो काय पहा ज्या नगरीकडे लाखो भाविकांची पावलं वळतात त्याच विठुरायाच्या नगरीत – तालुक्यात राहणाऱ्या हजारो तरुणांना कामधंद्यासाठी – रोजगारासाठी विठूरायाची नगरी सोडून पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थलांतर करावं लागत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादा व्यवसाय सुरु करावा असा विचार तरुणाच्या मनात आला तरी त्याला उद्योग उभारण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती पंढरपूर तालुक्यातील तरुणांची आहे. तालुक्यातील तरुणांवर हि वेळ आली त्याच कारण म्हणजे राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव.

नोव्हेंबर १९८४ साली एमआयडीसी सुरु करावी या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांनी मोर्चा काढला होता. त्यावेळेपासून ते आजतागायत ‘पंढरपुरात एमआयडीसी होणार.. एमआयडीसी होणार..’ असं ऐकण्यात काही पिढ्या गेल्या मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र कर्तव्यदक्ष आमदार समाधान दादा आवताडे यांनी पोटनिवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजुरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अगदी त्याच पद्धतीने एमआयडीसी मंजूर करण्यासाठी मेहनत घेतली. कोणत्याही परिस्थितीत एमआयडीसी मंजूर करून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणार असा संकल्प समाधान दादांनी केला. राज्यात विरोधी पक्षाची सत्ता असताना नोव्हेंबर २०२१ रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे समाधान दादांनी प्रथम पंढरपूर एमआयडीसी मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु केला.

पुढे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आमदार समाधान दादा आवताडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु केला. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी जागेची पाहणी करून पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील जागेचा एमआयडीसीसाठी प्रस्ताव दिला. जून २०२३ मध्ये अव्वर सचिव महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांचे मान्यतेचे पत्र आल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये उद्योगमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेत कार्यवाहीची सूचना दिली. पंढरपूर तालुक्यासाठी अखेर तो सुवर्णदिवस उजाडला.. २१ ऑगस्ट २०२४ रोजी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील एमआयडीसीची अधिसूचना निघाली.

एमआयडीसीची अधिसूचना निघाली.. पंढरपूर शहरासह तालुक्यातील जनतेने पेढे अन साखर वाटत एकच जल्लोष केला. आमदार समाधान दादा आवताडे यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या मंजुरीचं पत्र विठुरायाच्या चरणावर ठेवत आशीर्वाद घेतले. कार्यपुर्तीचा कृतार्थ भाव चेहऱ्यावर ठेवत कर्तव्यपथावर चालत सतत जनतेच्या सेवेसाठी झटणारा कार्यमग्न आमदार म्हणून समाधान दादा जनतेला भावतात ते त्यांच्या याचं स्वभावामुळे. समाधान दादांसारखा कर्तव्य दक्षपणा न दाखवल्याने १९८४ साली मोर्चा काढणाऱ्या तत्कालीन युवकांना त्यावेळी न्याय मिळाला नाही पण निश्चितच अधिसूचना निघाल्यानंतर त्यांच्या पुढच्या युवा पिढीला न्याय मिळाला आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *